- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी दुसºया टप्प्यात १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत शासनामार्फत प्राप्त झाली असून, उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ७०० शेतकºयांच्या याद्या १७ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा कोषागारात सादर करण्यात आल्या आहेत. याद्यानुसार १३१ कोटी ९८ लाख ३७ हजार रुपये मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बुधवार, १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी १८ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांची मदत गत १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मदत वाटपाच्या दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरीत करण्यात आलेली मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी तहसील कार्यालयांमार्फत जिल्ह्यातील ५२० गावांमधील १ लाख ३० हजार ७०० शेतकºयांच्या याद्या तयार करून १७ डिसेंबर रोजी जिल्हा कोषागारात सादर करण्यात आल्या. या याद्यानुसार शेतकºयांच्या बँक खात्यात १३१ कोटी ९८ लाख रुपये मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
मदत वाटपासाठी १.३० लाख शेतकऱ्यांच्या याद्या कोषागारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:02 AM