अकोला: बकरी ईद, श्रावणमासानिमित्त निघणारी कावड यात्रा व धारगड यात्रेच्या पृष्ठभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शहरात शांतता नांदावी, या दृष्टिकोनातून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी १३६ गुंडांना आठ दिवसांसाठी तडीपार केले आहे.१२ आॅगस्ट रोजी बकरी ईद हा उत्सव, १९ आॅगस्ट रोजी दुसºया श्रावण सोमवारी धारगडची यात्रा आणि २६ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवार असल्याने शहरातून मोठी कावड यात्रा निघते. या पृष्ठभूमीवर शहरात अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टिकोनातून उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४(२) नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून अकोला शहरातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १३६ गुंडांना शहरातून तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.
तडीपार केलेले गुन्हेगारएमआयडीसी- १२खदान- ०९जुने शहर- ३०अकोट फाइल- २०सिव्हिल लाइन-२३डाबकी रोड- २४रामदासपेठ- ०९कोतवाली- ०९