अकाेला : गायगाव पेट्राेल, डिझेल डेपाेत येणाऱ्या रेल्वेच्या वॅगनमधून पेट्राेल व डिझेलची चाेरी करणाऱ्या १४ आराेपींना भुसावळ रेल्वे न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ तर, आरपीएफमध्ये त्यावेळी कार्यरत असलेल्या तीन अधिकाऱ्यांची पुरावे न मिळाल्याने निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे़ गायगाव येथील पेट्रोप डेपोत उभ्या असलेल्या रेल्वे वॅगनमधून ४०० लीटर पेट्रोल चोरीस गेल्याची घटना १० ऑगस्ट २०१८ रोजी घडली होती. या पेट्राेल चाेरी प्रकरणात संशयित आरोपींमध्ये आरपीएफचे तत्कालीन पाेलीस उपनिरीक्षक आर.एन. यादव, प्रशांत मगर, समाधान ढोकणे विरुद्ध चौकशी करण्यात आली हाेती. तर, आरपीएफचे पोलीस निरीक्षक विनोद लांजेवारसह तिघांना निलंबित करण्यात आले होते. डेपोतील पेट्रोल, डिझेल चोरणा-या चोरट्यांशी संबंध असल्याचा या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर आरोप होता. तर, पेट्राेल चाेरट्यांमध्ये गाैरव गवई, शुभम सावळे, कुणाल सोनोने, शिवहरी भाकरे, गणेश भाकरे, रूपेश भाकरे, अक्षय आगरकर, सुधाकर रणवरे, साहेबखान समशेरखान पठाण, शेख रईस शेख इस्माईल, सय्यद जमीन सय्यद अब्बू, अविनाश होहड, फिरोज पठाण, हमीद पठाण, शेख जुबेर ऊर्फ खुर्शीद शेख अय्युब यांचा समावेश हाेता़ या चाेरट्यांविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला हाेता़ या आराेपींविरुद्धचा तपास करून भुसावळ न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले हाेते़ भुसावळ येथील रेल्वे न्यायालयाने या १४ आराेपींना दोषी ठरवत त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली़
रेल्वेच्या वॅगनमधून पेट्राेल चाेरणाऱ्या १४ जणांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 10:31 AM