अकोला: रमजान उत्सवादरम्यान अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सात पोलीस ठाणे अंतर्गत १४७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी मंगळवारी दिला. त्यामध्ये काही जणांना दोन व काही जणांना तीन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले.रमजान ईदच्या पृष्ठभूमीवर शहरात शांतता कायम राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या १४७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. त्यामध्ये रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत ७, आकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत १२, सिटी कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत १0, जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत २७, डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत १९, एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत ५७ आणि खदान पोलीस ठाणे अंतर्गत १६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये काही जणांना ५ ते ६ जुलै दोन दिवस आणि काही जणांना ५ ते ७ जुलै तीन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकार्यांनी दिला. पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार संबंधित गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले.
१४७ गुन्हेगार शहरातून तडीपार
By admin | Published: July 06, 2016 2:21 AM