नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये सात तालुक्यातील ४८६ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. त्यापैकी ७ हजार ६०३ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले. अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ ठिबक-तुषार सिंचन योजनेसाठी देण्यात आला.
--बॉक्स--
योजनेतून लाभार्थींना केलेले अनुदान वाटप
वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी १२२ लाभार्थींना ७६ लाख ३२ हजार रुपये, शेततळ्यांसाठी ९ लाभार्थींना ४ लाख ७८ हजार रुपये, होस्ट फार्मरसाठी ६२८ लाभार्थींना ४० लाख ८४ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. ठिबक तुषारसाठी ३,१८३ लाभार्थींना ७ कोटी २७ लाख ५९ हजार रुपये, शेळीपालनसाठी ७९८ लाभार्थींना २ कोटी ६१ लाख ३३ हजार रुपये, बीजोत्पादनसाठी १७१४ लाभार्थींना १ कोटी ७१ लाख ७२ हजार रुपये, पाइप-मोटरसाठी १ हजार १४९ लाभार्थींना १ कोटी ८९ लाख ८४ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.