मागील वर्षी केल्या ४६७ फेर्या; ६0 लाखांचे उत्पन्न
अकोला : पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून १५0 बसगाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी दिली आहे. ३0 जून ते १0 जुलै १७ च्या कालावधीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा भरते. त्यानिमित्ताने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसगाड्या दरवर्षी सोडल्या जातात. अकोला विभागातूनही या यात्रेनिमित्त नियोजन करण्यात आले आहे. अकोला -वाशिम या दोन्ही जिल्हय़ातून १५0 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला आगार (१) -१४, अकोला आगार (२) - ३३, अकोट -१३ , कारंजा -१२, मंगरूळपीर -११, वाशिम -३0, रिसोड २१, तेल्हारा-१0, मूर्तिजापूर-६ बसगाड्या धावणार आहेत, तसेच ५0 प्रवासी गटाची मागणी असल्यास त्या ठिकाणाहून राज्य परिवहन मंडळ स्वतंत्र सेवा देणार आहे. ग्रामीण प्रवाशांचा गटही त्यात सहभागी होऊ शकतो, असे असल्यास त्यांनी आगार प्रमुखांशी संपर्क साधावा. परतीच्या प्रवासासाठी आरक्षणाची व्यवस्थाही आगारात केली आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला विभाग नियंत्रकाकडून करण्यात आले आहे. मागील वर्षी अकोला विभागाने ४६७ फेर्या चालवून एकूण ६0.९७ लाखांचे उत्पन्न मिळविले होते. ४५९८६ प्रवाशांनी याचा लाभ मागील वर्षी घेतला होता.