अकोला: राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) इयत्ता दहावीसाठीची राज्यस्तर परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यातील ३३७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. अकोला जिल्ह्यातून या परीक्षेला १,५२२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी राज्यातून ८ हजार ८१९ शाळांमधून एकूण ९४ हजार २३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकोला जिल्ह्यातून १५२ शाळांमधून १,५२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉगिनवर २३ नोव्हेंबरपासून उपलब्ध करण्यात आली आहेत. विद्याथ्यार्थ्यांची प्रवेशपत्रे काढून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, पालकांना काही अडचण असल्यास किंवा दुरुस्ती असल्यास, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याशी संपर्क साधण्याविषयी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कळविले आहे.
अकोला जिल्ह्यातील १५२२ विद्यार्थी देणार प्रज्ञाशोध परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:19 AM
NTS Exam News दहावीसाठीची राज्यस्तर परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
ठळक मुद्देएकूण ९४ हजार २३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.१५२ शाळांमधून १,५२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.