नीलेश शहाकार/बुलडाणा : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालविल्या जाणार्या विदर्भातील रुग्णवाहिका मोठय़ा प्रमाणात नादुरुस्त असून, त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. विदर्भात १0१३ रूग्णवाहिका धावत असून, त्यापैकी १५८ रुग्णवाहिका विविध कारणांमुळे नादुरुस्त होवून अडगळीत पडल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या जून २0१५ च्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. विविध रुग्णालये, आरोग्यसंस्थांना रुग्णसेवा, वैद्यकिय मदत, औषधे पुरविणे आणि लसीकरण कार्यक्रमासाठी रुग्णवाहीका देण्यात आल्या आहे. राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागातील रुग्णांना वैद्याकिय सेवा पुरविण्यासाठी या रुग्णवाहीकांची भूमिका महत्वाची आहे. राज्यात पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर येथील विभागीय स्तरावरून आरोग्य विभागातील वाहनांचे कामकाज पाहिले जाते. अत्यवस्थ रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची असते; मात्र रुग्णवाहिकांच्या मागेही अपघाताचे दुखणे लागल्यामुळे, विदर्भातील १५८ रुग्णवाहिका अडगळीत पडून आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये अशी एकूण ६४२ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांसाठी १0१३ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५८ रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रुग्णसेवेवर परिमाण होत आहे.
जिल्हा रुग्णवाहिका बंद
नागपूर १२५ १४
वर्धा ६00 ५
अमरावती १९९ २0
अकोला ६७ १४
बुलडाणा ९३ ११
वाशिम ५५ 0२
यवतमाळ १00 २२
चंद्रपूर १0५ ३४
भंडारा ७६ 0४
गडचिरोली ११३ २५
गोंदिया १00 0७