लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार: चोरीच्या प्रकरणातील चोहोट्टा बाजार येथील एका आरोपीस ताब्यात घेण्यासाठी आलेल्या एका पोलिसावर हल्ला करणार्या आरोपीस अकोटच्या न्यायालयाने शनिवारी १६ महिन्यांची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. एका चोरीचा तपास करण्यासाठी सन २00९ मध्ये पोलीस कॉन्स्टेबन राहुल देवीदास इंगळे हे चोहोट्टा बाजार येथे आले होते. यावेळी आरोपी रवी रामदास डाबेराव याने डाबेरावने इंगळे यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी डाबेरावविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून हे.काँ. सुरेश वाघळकर यांनी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अकोट न्यायलयाचे न्यायाधीश पिसाळ यांनी रवी डाबेराव यास १६ महिन्यांची शिक्षा व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच दुसर्या गुन्हय़ातही ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.
पोलिसांवर हल्ला करणा-यास १६ महिन्यांची शिक्षा
By admin | Published: July 16, 2017 2:35 AM