शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१७९ शिक्षकांवर कारवाईचे आदेशच नाहीत!

By admin | Published: February 17, 2017 2:44 AM

अकोला जि.प. अंतर्गत शिक्षकांचेआंतरजिल्हा बदली प्रकरण; विभागीय आयुक्तांच्या अहवालाकडे दुर्लक्ष.

अकोला, दि. १६-जिल्हा परिषदेत पाच वर्षांच्या कार्यकाळात शेकडो आंतरजिल्हा बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांनी मे २0१६ मध्येच शासनाकडे सादर केला. अनियमिततेला जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह सर्व संबंधितांवर कारवाई करा, एवढेच शासनाने त्यावर सांगितले. त्याचवेळी १७९ शिक्षकांवर करावयाच्या कारवाईचे कोणतेच निर्देश न दिल्याने शिक्षण विभाग हातावर हात ठेवून बसला आहे. त्यामुळे नियमांना पायदळी तुडविणार्‍यांना शासनच पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. इतर जिल्हा परिषदांमधून अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने शेकडो शिक्षकांना सामावून घेण्यात आले. ते करताना शासन नियमांची पुरती पायमल्ली करण्यात आली. २0११ ते २0१५ या काळात आंतरजिल्हा बदल्यांमधून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपासून सर्व संबंधितांनी शिक्षकांकडून चांगलाच मलिदा लाटत सामावून घेतले. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांमुळे अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली मोडकळीस आली. त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र शेकडो शिक्षकांवर अन्याय झाला. शासनाकडे या बाबींच्या तक्रारी झाल्या. त्याची चौकशी विभागीय आयुक्तांच्या पथकाने केली. त्या पथकाचा चौकशी अहवाल शालेय शिक्षण विभागाकडे मे २0१६ मध्येच सादर करण्यात आला. त्या अहवालावरून आंतरजिल्हा बदल्यांचा घोळ करणार्‍या जबाबदार अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाईची प्रक्रिया शासनाच्या स्तरावर सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे, तर त्याचवेळी ज्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेतल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पदोन्नतीचा गळा घोटण्यात आला, त्या शिक्षकांवर कारवाईचे कोणतेही ठोस आदेश शासनाने दिलेच नाहीत. त्यामध्ये ८५ शिक्षकांच्या बदल्या एकतर्फी आदेशाने, ७९ शिक्षकांच्या आपसी बदल्या झाल्या, तर १५ शिक्षकांच्याही बदल्यांचा घोळ आहेच. एकूण १७९ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी चांगलाच मलिदा लाटत अनियमितता केल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये २0११ ते २0१५ या काळातील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा समावेश आहे. चौकशी अहवालामध्ये आंतरजिल्हा बदल्यांतील अनियमिततेला जबाबदार अधिकार्‍यांवर शासनाने कारवाई सुरू केल्याची माहिती आहे. सर्व शिक्षकांवर कारवाईनंतरच बिंदू नामावलीजिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली दुरुस्त करण्यासाठी आंतरजिल्हा बदलीने आलेले १७९ आणि जिल्हा परिषदेने राखीव जागांवर नियुक्ती दिलेल्या १३२ शिक्षकांनी जातवैधताच सादर केली नाही, त्या शिक्षकांना बडतर्फ करण्याची तरतूद आहे; मात्र आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांवर करावयाच्या कारवाईबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले.