अकोला: गत तीन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरीही लावली. परिणामी, नाफेडद्वारा खरेदी संथ गतीने सुरू होती. मात्र सोमवारी वातावरण स्वच्छ होताच नाफेड खरेदीला वेग आल्याचे दिसून आले. दि. २० मार्चपर्यंत नाफेडद्वारा ५ हजार ५०१ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.
खासगी बाजारात भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी मंगळवार, दि. १४ मार्पाचसून सुरू झाली आहे. गत तीन-चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने खरेदी संथ गतीने सुरू होती. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रुपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. दि. २७ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, आतापर्यंत १७ हजार ६६० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे.
शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार
नाफेडद्वारा पातूर तालुक्यातील विवरा येथील खरेदी केंद्रावर मुहूर्ताला खरेदी करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पातूर व विवरा येथे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी. एस. शिंगणे यांचे हस्ते खरेदीला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील अंदुरा, उगवा आदींसह १४ खरेदी केंद्रावर खरेदी सुरू आहेत.
अशी आहे केंद्रानिहाय ऑनलाईन नोंदणी
खरेदी केंद्र शेतकरी संख्या
बार्शीटाकळी ३२८२
वाडेगाव २११७पातूर १३०२
तेल्हारा २५७३पारस ४०६४
विवरा १०८९अंदुरा ३६१
बेलखेड ९८८थार ९३४
उगवा ९५०