सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) केंद्र सरकार मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. ही परीक्षा ६ एप्रिल २०२१ ला घेण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील १७७ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली. संबंधित विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत प्रतिमाह एक हजार रुपये याप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून, सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कोरोना काळातही जिल्ह्यातील बऱ्याच शाळांनी एनएमएमएस परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
१. तेल्हारा - ६५
२. अकोट - ५४
३.अकोला - ३९
४. मूर्तिजापूर - ०८
५. बार्शीटाकळी - ०५
६. बाळापूर - ०४
७. पातूर - ०२
दरमहा १००० रुपये शिष्यवृत्ती
प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याला मिळते.