अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कापशी रोड व मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि सातही तालुक्यांतील ९४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये कापशी रोड ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १० फेबु्रवारीपर्यंत मुदत होती, तर घुंगशी या एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, १२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत होती. त्यामध्ये घुंगशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी १५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.घुंगशी ग्रा.पं.साठी असे दाखल झाले अर्ज !मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० उमेदवारी अर्र्ज दाखल झाले. त्यामध्ये सरपंच पदासाठी पाच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले.९४ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकांसाठी असे दाखल झाले उमेदवारी अर्ज !तेल्हारा - ३२अकोट- २०मूर्तिजापूर - १३अकोला - २५बाळापूर - २०बार्शीटाकळी - ३४पातूर - १५....................................एकूण १५९आठ सरपंच पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!९४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येत असलेल्या पोटनिवडणुकांमध्ये १५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी काही सदस्य पदांसाठी आणि आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.