शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

१८00 १११ ३२१ : रेल्वेची नवी हेल्पलाईन

By admin | Published: December 08, 2014 11:47 PM

आता निकृष्ट खाद्यपदार्थांची बिनधास्त करा तक्रार!

राम देशपांडे/अकोला रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर विकण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांची गुणवत्ता चांगली ठेवण्याचा दृष्टीकोनातून भारतीय रेल्वे प्रशासनाने १८00१११३२१ या क्रमांकाची नवीन हेल्पलाईन सुरू केली असून, या हेल्पलाईनवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाचं नियंत्रण राहणार आहे. रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांमार्फत (वेंडर्स) निकृष्ट खाद्यपदार्थ विकण्याचे प्रकार अलिकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा वजनात कमी भरणारे व निर्धारित दरांपेक्षा जास्त दराने खाद्यांन्नांची विक्री होत असल्याच्या तक्रारीही रेल्वे प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाल्यात. रेल्वेच्या यापूर्वीच्या अर्थसंकल्पात यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीकोनातून विशेष तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय रेल्वे प्रशासनाने १८00 १११ ३२१ या क्रमांकाची नवी हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टीकोनातून या हेल्पलाईन क्रमांकावर येणार्‍या येणारे फोन कॉल्स रेकॉर्ड केले जाणार आहेत. याशिवाय धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये वितरित केल्या जाणार्‍या जेवणाची व इतर खाद्यपदार्थांंची गुणवत्ता चांगली आहे की वाईट, याची खातरजमा करून घेण्यासाठी विशेष गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या नागरिकांकडून फोन कॉल्स रेकॉर्ड करणार्‍या अंतर्गत प्रणालीद्वारे प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार आहेत. एका त्रयस्थ कॅटरिंग सर्व्हिसकडून प्रत्येक विभागात या प्रणालीचे वेळोवेळी ऑडिट केले जाणार आहे. विविध विभागांमध्ये नोव्हेंबर २0१२ ते ऑक्टोबर २0१४ दरम्यानच्या कालावधीत धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना अत्यंत निकृष्ट जेवण देण्यात आल्याची १९६ प्रकरणं रेल्वे प्रशासनासमोर आली आहेत. त्यापैकी ५२ प्रकरणांमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे.