परीक्षेमध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी ९० गुणांचे ९० बहुपर्यायी प्रश्न, दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणीमध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान, भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित असे एकूण ९० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. अ.भा पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ कोटा निश्चित आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर हायस्कूल, उस्मान आझाद हायस्कूल, जागेश्वर विद्यालय वाडेगाव, शिवाजी विद्यालय अकोट, सेठ बंशीधर विद्यालय तेल्हारा, मांगीलाल शर्मा विद्यालय, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी, सरस्वती विद्यालय अकोट, स्वावलंबी विद्यालय, माऊंट कारमेल हायस्कूल आदी केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक आर. के. देशमुख, भानुदास यन्नावार, सुनील मसने, सुरेंद्र देशमुख, इम्तियाज अहमद खान, हरीश शर्मा, भूषण ठाकूर, नीता मोरे, मीना धुळे, गजेंद्र काळे यांनी काम पाहिले. परीक्षा केंद्रांना शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, श्याम राऊत, शब्बीर हुसैन, जिल्हा विज्ञान मंचाचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, इकबालभाई यांनी भेटी दिल्या.
फोटो: