शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

१९ विकास कामांच्या निविदा रद्दची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:07 AM

अकोला : आधीच जिल्हा परिषदेच्या योजना, विकास कामांचा बोजवारा उडालेला असताना काही पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या मर्जीतील ठरावीक कंत्राटदारांना कामे मिळत नसल्याचा अंदाज आल्याने निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची तयारी बांधकाम विभागाने चालविली आहे. याप्रकरणी निर्णय घेणार्‍या समितीपुढे तसा प्रस्ताव मांडल्याने १९ पैकी तीन कामे वगळता इतर कामांच्या निविदा रद्द होण्याची शक्यता आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निविदा रद्द होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे२ कोटी १४ लाखांतून विविध कामांसाठी पुन्हा निविदा १९ पैकी तीन कामे वगळता इतर कामांच्या निविदा रद्द होण्याची शक्यताएवढय़ा मोठय़ा प्रमाणात निविदा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आधीच जिल्हा परिषदेच्या योजना, विकास कामांचा बोजवारा उडालेला असताना काही पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या मर्जीतील ठरावीक कंत्राटदारांना कामे मिळत नसल्याचा अंदाज आल्याने निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची तयारी बांधकाम विभागाने चालविली आहे. याप्रकरणी निर्णय घेणार्‍या समितीपुढे तसा प्रस्ताव मांडल्याने १९ पैकी तीन कामे वगळता इतर कामांच्या निविदा रद्द होण्याची शक्यता आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निविदा रद्द होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून मंजूर कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यामध्ये खुले कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी प्रत्येकी सात तर मजूर सहकारी संस्थांसाठी पाच कामे ठेवण्यात आली. त्यानुसार १९ कामांसाठी मोठय़ा प्रमाणात निविदाधारकांनी सहभाग घेतला. निविदेतील वेळापत्रकानुसार २३ जुलै रोजी कंत्राटदारांच्या पात्रतेच्या निकषाचे बंद पाकीट उघडण्यात आले. त्यानंतर कामांच्या दराचे पाकीट उघडणे अद्यापही बाकी आहे. कंत्राटदारांची पात्रता ठरविताना त्यांना ३१ मार्च २0१७ पर्यंंंतचा व्हॅट क्लीअर असल्याची अट ठेवण्यात आली. त्यापैकी अनेकांनी तसे प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे काम घेणार्‍यांमध्ये दराची स्पर्धा होणे आवश्यक आहे; मात्र स्पर्धेसाठी आवश्यक सहभागी निविदाधारकांची संख्या कमी आहे, असे कारण देत १९ पैकी १६ कामांची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यांच्या मंजुरीनंतर बांधकाम विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्याकडे निर्णयासाठी प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या निर्णयावर निविदा रद्द होणे, प्राप्त निविदाधारकांपैकी निवड होणे, या बाबी अवलंबून आहेत.

रद्द होणार्‍या निविदा प्रक्रियेतील कामेपोपटखेड येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान, वरूर विटाळी रस्ता, हिवरखेड रस्ता काँक्रिटीकरण, मेडशी-अंधारसावंगी रस्ता, शेळद जोडरस्ता, अडगाव येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान, वडाळी देशमुख-रंभापूर रस्ता डांबरीकरण, अंत्री मलकापूर-शिंगोली रस्ता खडीकरण, देऊळगाव-वडाळी देशमुख रस्ता खडीकरण, कोळविहीर रस्ता डांबरीकरण, सुकोडा रस्ता डांबरीकरण, बाभूळगाव-आलेगाव स्लॅबड्रेन बांधकाम, भटोरी जोडरस्ता, डोंगरगाव-उरळ नवीन रस्ता, कळंबा जोडरस्ता, काटेपूर्णा रस्ता, कुरूम रेल्वे स्टेशन, पिंजर-भेंडीकाजी रस्ता मजबुतीकरण.या कामांचा समावेश आहे.