अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आणि बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २६ जून रोजी आणखी १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३६१ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ९९० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी १५५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील पाच जण अकोट फैल येथील, तीन जण गुलजारपुरा येथील, तीन जण लाडीस फैल, दोघे हरिहर पेठ येथील तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट, आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर, तारफैल, इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.७४ जणांचा मृत्यूकोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण ९९० जण कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता २९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राप्त अहवाल-१५५पॉझिटीव्ह अहवाल-१९निगेटीव्ह-१३६एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३६१मयत-७४ (७३+१)डिस्चार्ज-९९०दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२९७
अकोल्यात आणखी १९ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १३६१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:38 AM
शुक्रवार, २६ जून रोजी आणखी १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी १५५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. २९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.