- सचिन राऊत
अकोला: शासन दरबारी अडलेले कामकाज करण्यासाठी सामान्यांना लाच मागणाºया १९५ लाचखोरांच्या तक्रारीनंतर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या १९५ लाचखोरांना रंगेहाथ तसेच रेकॉर्डिंगवरून अटक केली; मात्र या लाचखोरांवर संबंधित विभागाने अद्यापही निलंबनाची कारवाई केली नसल्याने शासनच या लाचखोरांवर मेहेरबान झाल्याचे वास्तव आहे.राज्यातील ८ परिक्षेत्रातील एक हजारावर लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यामधील तब्बल १९५ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. या लाचखोरांना शासनच पाठीशी घालत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच लाचखोरांना अभय देण्यासाठी संमती असल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत तब्बल १९५ लाचखोरांचे निलंबन न केल्यामुळे लाचखोरांची हिंमत आणखीच वाढत असल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या आक डेवारीवरून समोर येत आहे. या लाचखोरांमध्ये सुमारे २३ लाचखोर हे क्लास वनचे अधिकारी आहेत. ५० लाचखोर हे वर्ग ३ चे कर्मचारी असल्याचे वृत्त आहे. २३ क्लास वन अधिकाºयांना अभयराज्याच्या विविध शासकीय सेवेतील लाचखोर असलेल्या २३ क्लास वन अधिकाºयांना मोठ्या रकमेची लाच घेताना राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मोठ्या शिताफीने तसेच हिमतीने अटक केली; मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या लाचखोरांचे काळे कारणामे झाकण्यासाठी त्यांचे अद्यापही निलंबन केले नाही. वर्ग २ च्या २३, वर्ग ३ च्या ९२ लाचखोरांचेही अद्याप निलंबन झालेले नाही. वर्ग ४ च्या ७ तर इतर लोकसेवक असलेल्या ५० जणांचे निलंबन बाकीच आहे. खटले चालविण्यात गतीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे खटले आधी केवळ जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात येत होते; मात्र काही दिवसांपासून एसीबीचे खटले आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात येत असल्याने लाचखोरांना शिक्षा होण्याचे किंवा ते निर्दोष होण्याचे खटले गतीने मार्गी लागत आहेत. यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचा ताणही कमी झाला आहे. दोषसिद्धीमुळे शिक्षेचे प्रमाण वाढले!लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करण्यासाठी दोषसिद्धी प्रणाली अमलात आणली. त्यामुळे आरोपींना कायद्यातून सुटण्याच्या वाटा कमी झाल्या. याचेच फलीत म्हणून १ जानेवारी २०१९ ते आजपर्यंत लाच स्वीकारलेल्या ६२ लाचखोरांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये १२ लाचखोर हे क्लास वन अधिकारी आहेत. ०७ लाचखोर वर्ग २, ३४ लाचखोर वर्ग ३ चे कर्मचारी आहेत. तर २ लाचखोर वर्ग ४ चे कर्मचारी असून, शासन सेवेत नसलेल्या ५ लाचखोरांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
निलंबन न केलेल्यांची परिक्षेत्रनिहाय आकडेवारीपरिक्षेत्र आकडेवारीमुंबई २५ठाणे १४पुणे १५नाशिक ०६नागपूर ३४अमरावती २२औरंगाबाद ३०नांदेड ४९-----------------------------