- संतोष येलकर
अकोला: गत तीन वर्षांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्ह्यातील अकोट आणि बार्शीटाकळी तालुक्यातील सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १० (१-अ) नुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या कालावधीत संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील अकोट व बार्शीटाकळी या दोन तालुक्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सात सरपंच आणि १९४ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत (एक वर्षात) जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. यासंदर्भात संबंधित सरपंच आणि सदस्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर यासंदर्भात उपविभागीय अधिकाºयांकडून जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोट तालुक्यातील पाच सरपंच आणि १०३ ग्रामपंचायत सदस्य तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सरपंच आणि ९१ ग्रामपंचायत सदस्य असे एकूण सात सरपंच आणि १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले आहे.अकोट व बार्शीटाकळी तालुक्यातील असे अपात्र ठरले सरपंच-सदस्य!तालुका सरपंच सदस्यअकोट ५ १०३बार्शीटाकळी २ ९१..................................................एकूण ७ १९४आदेश अंमलबजावणीचे ‘बीडीओं’ना निर्देश!अकोट तालुक्यातील पाच सरपंच व १०३ ग्रामपंचायत सदस्य आणि बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सरपंच व ९१ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अकोट व बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना (बीडीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत सोमवारी निर्गमित करण्यात आले.