याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त बाबाराव बिहाडे, पुरुषोत्तम लाजूरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव पु. जायले पाटील, अविनाश ऊर्फ किशोर गावंडे, अशोकराव बिहाडे, दादाराव पुंडेकर, महादेवराव ठाकरे, साै. सुनंदाताई आमले, जयदीप सोनखासकर, गजाननराव चाेपडे, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, श्रीमती कमलाताई गावंडे, दिलीपराव हरणे, अनिल काेरपे, ॲड. शिरीश ढवळे, गजाननराव दुधाट यांची उपस्थिती होती.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेवर भक्तांची श्रद्धा विश्वास व सहकार्यामुळे संस्थेची प्रगती होऊ शकली, असे उदगार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.ह.भ.प. वासुदेवराव महल्ले यांनी काढले. या सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल संस्थेचे अध्यक्ष यांनी सादर केला. अंदाजपत्रक व अंकेक्षण अहवाल व आर्थिक हिशेबाचे पत्रके संस्थेचे काेषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर यांनी वाचन करून संस्थेच्या आजीवन सर्व सभासदांना माहिती दिली व संभेत ऑनलाईन उपस्थितीत सभासदांनी त्यास मंजुरी दिली. सभेचे संचालन सचिव रवींद्र वानखडे तर आभार प्रदर्शन सहसचिव माेहनराव जायले पाटील यांनी केले. या कार्यक्रमांतर्गत संस्थेचे विश्वस्त कमलताई गावंडे यांनी संस्थेतील वीणेकरी/ सेवाधारी यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. (वा.प्र.) 8 बाय १०