लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खांडवा या मीटरगेज लोहमार्गावरील अकोला ते अकोट हा ४४ किमी लांबीचा पट्टा ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्यात आला असून, २३ आणि २४ जुलै रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पार पडलेल्या पाहणी (सीआरएस) नंतर हा लोहमार्ग अधिकृतरीत्या कार्यान्वित झाल्याची घोषणा दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी केली आहे. नव्याने झालेल्या या ब्रॉडगेज मार्गावर दोन मोठे, तर तब्बल ३८ छोटे पूल उभारण्यात आले असून, पाच रेल्वेस्थानकेही नव्याने उभारण्यात आले आहेत.भारतीय रेल्वेच्या युनी गेज परिवर्तन संकल्पनेतून अकोला - खांडवा ही १७५ किलोमीटरची मीटर गेज लाइन ब्रॉडगेज परिवर्तन करण्याकरिता २००८-०९ मध्ये २,०६७ कोटी रुपये अंदाजित खर्चाने मंजूर करण्यात आली. हे गेज परिवर्तनाचे कार्य बांधकाम विभाग, दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रीय कार्यालय करत आहे. यातील पहिला टप्प्यातील अकोला ते अकोट या ४४ किलोमीटर गेज रेल्वे लाइनचे परिवर्तन ब्रॉड गेजमध्ये करण्यात येऊन ही ४४ किलोमीटर ब्रॉड गेज लाइन रेल्वे गाडी चालविण्याकरिता अधिकृतरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे.
अकोला ते अकोट ब्रॉडगेज मार्गाची वैशिष्टे३८ छोटे रेल्वे पूल आणि २ मोठे रेल्वे पूल या विभागात बांधण्यात आलेत. याशिवाय आणखी एक मोठा रेल्वे पूल बांधण्यात आला आहे.0५ रेल्वेस्थानके नव्याने बांधण्यात आलीत. या नवीन रेल्वेस्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत.२२ रेल्वे गेट जे मीटर गेजदरम्यान उपलब्ध होते त्या सर्व २२ रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी पूल बांधण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवासी सुविधेत वाढ झाली आहे. या भुयारी पुलामुळे रोड प्रवास अखंडपणे सुरू ठेवता येईल.अकोला रेल्वे स्थानकावरील यार्ड रेमॉडेलिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या तीन लाइन (एक मेन लाइन आणि दोन लूप लाइन) सोबत चौथी लूप लाइन टाकण्यात आली आहे.
अकोला ते खांडवा गेज परिवर्तनाचा हिस्सा असलेले अकोला-अकोट ब्रॉडगेजचे कार्य पूर्ण झाल्यामुळे अकोला येथून खांडव्याला जाण्याकरिता सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होईल. तसेच हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला मध्य प्रदेश सोबत जोडण्यात अतिशय महत्त्वाचा ठरेल.- गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे