शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मोर्णा नदीच्या ‘डीपीआर’साठी २ कोटी

By admin | Published: April 15, 2017 1:57 AM

अकोला: गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.

अर्थमंत्री मुनगंटीवार यांची मंजुरीअकोला: गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. सौंदर्यीकरणासाठी केंद्र शासनामार्फत निधी प्राप्त होणार असून, यापूर्वी मनपा प्रशासनाने नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागाराने मोर्णा नदी पात्रासह परिसरातील जमिनीच्या मोजमापाची प्रक्रिया पूर्ण केली. मोर्णा नदीचा ‘डीपीआर’तयार करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे.शहरातील नाले-गटारांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नदीचा वापर केला जातो. गुजरातमध्ये साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी खासदार संजय धोत्रे यांनी पुढाकार घेतला. योजनेचा आवाका मोठ्या प्रमाणात असल्याने मध्यंतरी मनपा प्रशासनाने तांत्रिक सल्लागारपदी विनायक कौंडिण्य यांची नियुक्ती केली. कौंडिण्य यांनी आस्टूल-पास्टूल येथून नदीचा सर्व्हे केला असून, मोर्णा नदीच्या पात्राची तसेच नदीकाठच्या परिसराची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. सौंदर्यीकरणाच्या कामाला गती यावी यासाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, नदीचा ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.