विशेष पथकाचा शहरातील ६ जुगार अड्ड्यांवर छापा
अकोला : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. या सहा जुगार अड्ड्यांवर २० जुगाऱ्याना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सागर रविशंकर जयस्वाल, शेख मोबीन शेख जमील, वामन सखाराम बेलोकार, गोविंदा तेजराव सदांशिव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर याच परिसरातील दुसऱ्या जुगारावर छापा टाकून शेख रमजान शेख शेरू, शेख फारुख शेख अहमद, शेख अहमद शेख रहमत या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरसेवकाचा भाऊ असलेला गुड्डू पठाण अलियार पठाण याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून विनोद महेंद्र आगरकर, संतोष देवराव इंगळे, संदीप शंकर दगवाडे, धम्मपाल विनायक डोंगरे या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर धाड टाकून शेख अजिज शेख शेरू मोहम्मद, शेख जावेद शेख अजीज यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खादान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सागर मोतीराम दनाने, प्रवीण श्रीराम दांदळे, राकेश दिलीप वाडेकर, शैलेश विजय गोलाईत, सुशील श्रीकृष्ण गाढवे, शिवाजी भिकुजी ठाकरे, बबलू सिंग सत्यपाल सिंग बावरिया यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.