लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयाच्या वीस लाख रुपयांच्या नोटा खोलेश्वर भागात जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी राकेश अशोकराव तोहगावकर (२७) याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. दुचाकीवरुन (एमएच ३० एके २५६४) एक व्यक्ती चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुचाकीवर पाळत ठेवून पाठलाग केला. खोलेश्वर परिसरात या दुचाकीला अडविले. यावेळी दुचाकीस्वार राकेश तोहगावकर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता, त्यात हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या. यामध्ये एक हजाराच्या नोटांचे नऊ लाखांचे बंडल आणि पाचशेच्या नोटांचे ११ लाखांचे बंडल, असे एकूण २० लाख रुपये सापडले. पोलिसांनी ही रोकड जप्त करुन राकेशला अटक केली. सदर माहीती आयकर विभाग नागपूरला देण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर आणि विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, एएसआय अशोक चाटी, नीलेश गोरे, अजय नागरे, शेख हसन, अ. मजिद, एजाज अहेमद, संदीप तवाडे यांनी केली.नागपूरच्या रॅकेटशी संबंध?चलनातून बाद झालेल्या २० लाखांच्या या प्रकरणाचे धागेदोरे नागपूरस्थित रॅकेटशी असल्याचे समजते. जप्त करण्यात आलेल्या वीस लाखाच्या बदल्यात एक टोळी चार लाख रुपये तर दुसरी टोळी याच नोटांच्या बदल्यात बारा लाख देणार असल्याचे सुत्राचे म्हणने आहे. नागपूरशी जुळलेल्या या रॅकेटमध्ये अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चलनातून बाद झालेल्या २० लाखांच्या नोटा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:53 AM
अकोला : चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयाच्या वीस लाख रुपयांच्या नोटा खोलेश्वर भागात जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी राकेश अशोकराव तोहगावकर (२७) याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.
ठळक मुद्देअकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एका जणाला अटक