अकोला : सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांना असलेली मागणी पाहून बनावट व भेसळयुक्त पदार्थांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. अकोल्यातील जुने शहर भागात बनावट व भेसळयुक्त तूप बनविण्याचा उद्योग जोरात सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी या भागातील काही घरांवर छापा टाकून तब्बल २०० किलो तूप जप्त केले. यावेळी १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांच्या या कारवाईने भेसळयुक्त पदार्थांचा गोरखधंदा करणाºयांचे धाबे दणाणले आहे.दिवाळी तोंडावर आली असताना, शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी अनेक जण बनावट वस्तूंचा व्यापार करतात. अकोल्यातील शिवसेना वसाहत, कमला नगर या भागात बनावट तूप बनविण्याचा गोरखधंदा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारीउमेश माने यांच्या पथकाने काही घरांवर छापा मारून २०० किलो बनावट तुप जप्त केले. आरोपींकडून नकली तूप तयार करण्याची मोठी सामग्री जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी बनावट तूप २०० किलो, वनस्पती तूप पाकीट १६० यासह गॅस सिलेंडर, शेगडी, डब्बे व इतर साहित्य असा एकूण ५६ हजार रुपयांच्या जवळपास मुद्धेमाल जप्त करून १३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक बाळकृष्ण पवार व त्यांच्या सहकारी पोलिसांनी केली आहे.
अकोल्यात पकडले २०० किलो बनावट तूप; सणासुदिच्या दिवसांत सुरु होता गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:12 PM
अकोल्यातील जुने शहर भागात बनावट व भेसळयुक्त तूप बनविण्याचा उद्योग जोरात सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी या भागातील काही घरांवर छापा टाकून तब्बल २०० किलो तूप जप्त केले.
ठळक मुद्दे५६ हजार रुपयांचा माल जप्त १३ आरोपींना ताब्यात घेतले