- नितीन गव्हाळे
अकोला: सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाºया एसटी बसेसची चाकेसुद्धा थांबली आहेत. संचारबंदीचा फटका परिवहन महामंडळाला बसला असून, गत आठ दिवसांमध्ये परिवहन महामंडळाचे ४0 लाखांवर उत्पन्न बुडाले आहे. एसटीला आतापर्यंत १ लाख ४६ हजार ५२ किलोमीटरपर्यंतचा प्रवास रद्द कराव्या लागल्या आहे. कोरोना व्हायरसमुळे अकोला विभागातील अकोला व वाशिम जिल्ह्यातील बसस्थानकांवर प्रवासी फिरकत नसल्यामुळे एसटी बसगाड्या थांबल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. बसस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. अकोला आगारामध्ये परिवहन विभागाच्या एकूण ४१५ बसगाड्या आहे. या सर्व बसगाड्या तालुक्यांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये फेºया करतात; परंतु गावागावांमध्ये लोकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्या पृष्ठभूमीवर एसटी बसगाड्यांची चाके थांबली आहे. अकोला आगारातील तब्बल ४१५ बसगाड्या बसस्थानकावरील वर्कशॉपमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. प्रवास फेºयाच बंद असल्यामुळे वाहक, चालकांनी सुटी देण्यात आली आहे. अकोला विभागातील बसगाड्यांच्या तब्बल २ हजार २२0 फेºया रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे गत आठ दिवसांपासून परिवहन विभागाचे मोेठे आर्थिक नुकसान होत आहे. यासोबतच परिवहन महामंडळाच्या अकोला आगाराने विद्यार्थिनींसाठी सुरू केलेल्या मानव विकास मिशन अंतर्गत ९ हजार ५९४ किलोमीटरच्या एकूण ३९८ बस फेºयारद्द केल्या आहेत. राज्यात सर्वत्र परिवहन महामंडळाला कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीचा फटका सहन करावा लागत आहे.