राज्यातील चारही प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गातील १,८४७ पदे प्रस्तावित आहेत. ही पदे तीन टप्प्यांमध्ये भरली जाणार असून, पहिल्या टप्प्यात त्यातील ८८८ पदांना काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये अकोल्यासह यवतमाळ आणि लातूर सुपर स्पेशालिटीसाठी प्रत्येकी २२३, तर औरंगाबादसाठी २१९ पदांची निश्चिती शुक्रवारी शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. या पदांच्या वेतनावर प्रथम वर्षाचा खर्च म्हणून शासनाने ४२ कोटी ९९ लाख, २३ हजार ५६८ रुपये मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यातील चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालये येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ही पदे भरणार
संवर्ग - जिल्हा
- औरंगाबाद - यवतमाळ - लातूर - अकोला -
गट- अ - ०७ - ०९ - ०९ - ०९
गट- ब - ०८ - १० - १० - १०
गट-क (नियमित)- ९७ - ९७ - ९७ - ९७
गट-क (बाह्यस्रोत)- ०७ - ०७ -०७ - ०७
गट-ड (कंत्राटी) - ८६ - ८६ - ८६ - ८६
वरिष्ठ निवासी-१ - ०५ - ०५ - ०५ - ०५
वरिष्ठ निवासी-२ - ०५ - ०५ - ०५ - ०५
वरिष्ठ निवासी-३ - ०४ - ०४ - ०४ - ०४
---------------------------------------
एकूण - २१९ - २२३ - २२३ - २२३