लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या २८ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, दोन शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची २८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली.त्यामध्ये नारायण पूर्णाजी वाघमारे -कानशिवणी, अविनाश गजानन वैतकार -डाबकी, बाळू नामदेव गावंडे -मजलापूर दापुरा, सुनील मधुकर तायडे -कौलखेड जहागीर, अरुण शेषराव काठोळे -गांधीग्राम, श्यामराव काशीराम लांबतुरे -धानोरा, देवीदास संपत मेश्राम -खरप ढोरे, अजय भीमराव बोर्डे -मूर्तिजापूर, शंकर वासुदेव राजनकर -मुंगशी, खोलेश्वर उत्तमराव कानडे -सांगवा, अमोल मधुकर काळे -अकोली जहागीर , धारु विठोबा कवडे -चारमोळी, शहादेव महादेव कासदे -वस्तापूर मानकरी, श्रीकृष्ण शालीग्राम जुनगरे -वडाळी देशमुख, रत्नदीप रमेश वानखडे -गायगाव, ओमप्रकाश अरुणसा उजवणे -अंदुरा , विकास गौतम दामोदर -हाता, राहुल दशरथ साबळे -कळंबी महागाव, सूर्यभान टिकाराम दामोदर -सागद, उमेश रामदास बावणे -हाता, गणेश बाळकृष्ण मानकर -पुनोती, नरसिंग जगदेव राठोड -बाभूळगाव, अमोल बाळू इंगळे -पळसो बढे इत्यादी शेतकरी आत्महत्यांची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, दोन शेतकरी आत्महत्या प्रकरणांध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, समितीचे सदस्य शिवाजीराव देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणीया यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्यांची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:10 PM