मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या २ हजार ७० जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर ४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने संबंधित ३२० उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांची ९ पदे रिक्त राहणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १ हजार ७४१ जागांसाठी मतदान घेण्यात येणार असून, एकूण ४ हजार ४११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये २ हजार ३९५ महिला उमेदवार असून, २ हजार १६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या
निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या पुरुष उमेदवारांच्या तुलनेत जास्त असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिला सदस्यांची संख्यादेखील जास्त राहणार असल्याचे चित्र आहे.
निवडणूक होत असलेल्या ग्रा.पं.
२२४
एकूण प्रभागांची संख्या
७६८
एकूण उमेदवारांची संख्या
४४११
एकूण महिला उमेदवारांची संख्या
२३९५
तालुकानिहाय महिला उमेदवारांची संख्या
तेल्हारा ......... ३१३
अकोट .......... ३६६
मूर्तिजापूर ...... २१२
अकोला ..........५०१
बाळापूर ........ ४०९
बार्शी टाकळी....२६५
पातूर ............. २४९
अकोला तालुक्यात
सर्वाधिक महिला उमेदवार!
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २ हजार ३९५ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार अकोला तालुक्यात आहेत. तालुक्यात ५०९ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर तालुक्यात ४०४ पुरुष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.