उरळ : येथील गोपाल शंकर गिरी ( २४) या युवकाने दि. ७ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा दि. ९ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. १० ऑगस्ट रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका, आजोबा बराच आप्त परिवार आहे.
--------------
महादेव निसंग यांचे निधन
बार्शीटाकळी : येथील जुने शहरातील रहिवासी महादेव दत्तूसा निसंग (९५) यांचे दि. ९ आगस्ट रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले, सुना, नातवंडे व आप्त परिवार आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील साखरविरा येथील वि.जा.भ.ज. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दिनकर निसंग यांचे ते वडील होते. (फोटो)
------
पीएम किसानचा टप्पा रखडला!
कवठा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिल्या जातो. मात्र बाळापूर तालुक्यातील कवठा, बहादुरा, लोहारा, कारंजा, निंबा या परीसरातील अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पीएम किसानचा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे.