अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, सहा शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ३१ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील माझोड येथील अन्नपूर्णा सहदेव तलगोटे, भौरद येथील नागेश विष्णू विसावे, धोतर्डी येथील शंकर शिवराम मोहाडे, गांधीग्राम येथील शेख उमर मन्नान व त्यांची पत्नी नजमाबी शेख उमर, चांदूर येथील माणिक श्रीराम बंड, कासली बु. येथील अनंता शांताराम काळमेघ, उगवा येथील महादेव हरिभाऊ उपराटे, म्हातोडी येथील अशोक महादेव गोरले, चिखलगाव येथील संजय पुंडलिक इंगळे, दहीहांडा येथील संतोष बाबाराव खेतखेडे, बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील अनिल भीमराव पाटील, पिंपळगाव हांडे येथील उकंडा रामचंद्र गिºहे, महान येथील साबीरबेग मिर्झा नासिरबेग, अकोट तालुक्यातील खैरखेड येथील गोवर्धन किसन सावंग, खापरवाडी येथील मधुकर महादेव वाघमारे, मार्डी खटकाली येथील देवीदास श्रीराम डोंगरे, मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू नजीक येथील आकाश सुधीर खांडेकर, सिरसो येथील मयूर सुनील मोंढे, वीरवाडा येथील जितेंद्र नारायण गवई, तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील भगवान ओंकार हेरोडे, रायखेड येथील दयाराम ज्योतीराम तायडे, पिवंदळ खुर्द येथील मनोरमा माणिकराव तळोकार, बाळापूर तालुक्यातील निंबी येथील पाडुरंग जयराम गव्हाळे, देगाव येथील राजेश सुखदेव वरोकार व पातूर तालुक्यातील सावरखेड येथील पूजाराम उत्तम चोंडकर इत्यादी शेतकरी आत्महत्यांची २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित सहा शेतकरी आत्महत्या प्रकरणांची फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.