अकोला: महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुल्ताना यांनी शाळेची पाहणी करीत असताना शालेय अभिलेखात अनियमितता आढळल्याप्रकरणी मंगळवारी सहा मुख्याध्यापकांसह २५ शिक्षक व चार शिपाई यांना ह्यकारणे दाखवाह्ण नोटीस बजावली. अर्धे शालेय सत्र आटोपल्यानंतर शिक्षण विभागाला अचानक जाग आली, हे विशेष. महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रचंड अनागोंदी माजली आहे. शिक्षणाधिकार्यांचे शिक्षकांसह कर्मचार्यांवर तसूभरही नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जून रोजी ह्यशाळा प्रवेशह्ण उत्सवाला अनुपस्थित राहणार्या शिक्षणाधिकारी शाहीन सुल्ताना यांनी अचानक मंगळवारी मनपा उर्दू शाळा क्र. ८, कन्या शाळा क्र. ५, हिंदी बालक शाळा क्र. ६ येथे तपासणी केली. यावेळी ८.४0 वाजता शिक्षक शाळेत हजर झाल्याचे समोर आले. मनपा मुलांची शाळा क्र. १९, हिंदी बालक शाळा क्र. ८ व उर्दू मुलांची शाळा क्र. ११ येथे तपासणी केली असता, खुद्द शिक्षकच गणवेशाविना आढळून आले. दैनिक टाचण, वार्षिक नियोजन, शालेय अभिलेखामध्ये अनियमितता दिसून आल्याने सहा मुख्याध्यापकांसह २५ शिक्षक व चार शिपाई यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सहा मुख्याध्यापकांसह २५ शिक्षकांना ‘शो कॉज’
By admin | Published: December 02, 2015 2:49 AM