महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने चाचणी केंद्रांत नागरिक गर्दी करीत आहेत. सोमवारी शहरातील २५९ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
पूर्व व दक्षिण झाेनचा आलेख कमी हाेईना!
फेब्रुवारी महिन्यापासूनच शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ९१ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये, उत्तर झोनमध्ये व दक्षिण झोनमध्ये असे एकूण २५९ रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान १०७३ जणांनी चाचणी केली. यामध्ये ४०५ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ६६८ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली आहे.