बुलडाणा, दि. १३- वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणार्या उद्योगाच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी आज स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे. राज्यात असे २ लाख ११ हजार सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग कार्यरत असून यातून २६ लाख ९५ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना केंद्र सरकारकडून विशिष्ट प्रोत्साहन दिले जाते आहे. यासाठी शासनाच्या सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजू व सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग केंद्रच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. वस्तू निर्माण आणि सेवा पुरविणार्या उपक्रमात वस्तू निर्माण उद्योग आणि सेवा पुरविणारे उद्योग यात सूक्ष्म, लघू व माध्यम असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा, अन्न, गृह उद्योग, खादी ग्रामोद्योग, दुग्ध व्यवसाय, अभियांत्रिकी, कृषी, गृहनिर्माण आदी क्षेत्रातील मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करून या तरुणांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आठ वर्षात गुंतवणूक व रोजगार वाढला!सूक्ष्म, लघू व माध्यम उपक्रम चौथी गणना २00६-0७ अनुसार राज्यात ३१ मार्च २00७ रोजी एकूण ८६,६६५ उद्योग कार्यरत होते. त्यामधील गुंतवणूक १४,८५९ कोटी होती तसेच १0.९५ लाख रोजगार होता; मात्र गेल्या सात वर्षात यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. २0१५-१६ या आर्थिक वर्षात ५0,६३७ कोटी गुंतवणुकीचे २,११,४0३ सूक्ष्म, लघू व माध्यम उपक्रम कार्यरत असून त्यामधून २६.९५ लाख रोजगार निर्माण झाला आहे.रोजगारासाठी जॉब पोर्टलसूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणार्यासाठी केंद्र सरकारने ६६६.ी७.ूिे२ेी.ॅ५.्रल्ल हे स्वतंत्र जॉब पोर्टल सुरू केले. याचा फायदा राज्यातील बेरोजगारांना होणार आहे. याशिवाय नव्याने नोकरी व रोजगार शोधात असणार्या तरुणांनाही याचा लाभ होणार आहे. एमएसएमई क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. विभागानुसार उद्योग व रोजगाराचा आलेख (२0१६)विभाग उद्योग रोजगारमुंबई २१८९५ ३.६६कोकण ३४६१३ ५.८४नाशिक २४२७९ २.९७पुणे ८३0३३ ९.४२औरंगाबाद १४८५९ १.७0अमरावती १0६४२ १.0१नागपूर २२0८२ २.३५एकूण २११४0३ २६.९५
स्वयंरोजगारातून २६ लाख युवकांना रोजगार!
By admin | Published: October 14, 2016 2:29 AM