शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

२६ लाखांचा थकला कर : हिवरखेड ग्रामपंचायतने वीजउपकेंद्राला लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:56 PM

हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले.

हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.कर भरण्याविषयी वारंवार सुचना देउनही महावितरणने भरना न केल्याने ही कारवाई केली. यावेळी दोन कर्मचाऱ्यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते. अखेर महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी कराची अर्धी रक्कम दहा दिवसात भरण्याचे आश्वासन दिल्याने उपकेंद्राचे सील दुपारी काढण्यात आले.मागील अनेक वर्षांपासून हिवरखेड येथील वीज उपकेंद्राकडे कर थकाला होता. थकीत असलेल्या कराचे एकूण २६ लक्ष रुपये वसुलीसाठी वारंवार सूचना देऊनही महापारेषणद्वारे हिवरखेड ग्रामपंचायतचा कर भरण्यात आला नाही. त्यामुळे, शेवटी हिवरखेडच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाºयांचा समवेत जाऊन महाराष्ट्र विज पारेषण कंपनीच्या हिवरखेड येथील १३२ केव्ही उपकेंद्राला सील ठोकले. यावेळी दोन कर्मचारी उपकेंद्रात कार्यरत असल्याने त्यांना सील लावण्याआधी बाहेर निघण्यास सांगण्यात आले. परंतु कर्तव्यावर असताना कार्यालय सोडता येणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने शेवटी त्यांना आतच कोंडून राहावे लागले.महापारेषण केंद्राला सील ठोकण्याची वार्ता हवेसारखी पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. महापारेषणचे अधिकारी तात्काळ हजर झाले आणि ग्रामपंचायत प्रशासनासोबत या विषयावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.सदर बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता मनोज झाडे, कार्यकारी अभियंता मनोज तायडे आणि महापारेषणचे कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सील परत काढण्याबाबत विनंती केली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी सरपंच अरुणाताई ओंकारे, ग्रा.प. सदस्य सुरेश ओंकारे, रवींद्र वाकोडे, हिफाजत खान, अझीझ खान , सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.जोड आहे

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत