शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नर्सरी, केजीचे २६ हजार चिमुकले यंदाही राहणार घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:28 AM

Education Sector News : यंदाही पूर्व प्राथमिक शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

कोरोना संकटामुळे शाळा बंदच

नितीन गव्हाळे, अकोला : कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. शिक्षण क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. लहान मुलांचे आयुष्यच बदलून गेले आहे. शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मोबाइल, टॅब स्क्रीनसमोर बसून मुलांनाही आता कंटाळा यायला लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता, अधिकच वाढत असल्याने, यंदाही पूर्व प्राथमिक शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यंदाही नर्सरी, केजीचे २६ हजारांवर चिमुकले विद्यार्थी घरातच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास, शाळा म्हटली की कंटाळा यायचा. अनेक विद्यार्थ्यांना बळजबरीने शाळेत पाठवावे लागायचे. अचानक कोरोना संसर्गाचा प्रवेश झाला आणि सर्वकाही ठप्प झाले. शाळांनाही सुट्टी द्यावी लागली. शाळेला सुट्टी मिळाल्याने, विद्यार्थी सुरुवातीला जाम खूश होते. मोबाइलच्या माध्यमातून, ऑनलाइन क्लासेस करण्यात, विद्यार्थ्यांना मजा यायची. क्लासनंतर मस्तपैकी खेळण्यास मिळत होते. परंतु नंतर मात्र, विद्यार्थ्यांचा अधिक वेळ मोबाइल स्क्रीनवर जात असल्याने, मुले कंटाळा करायला लागली. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरातील मोठी माणसे मुलांना सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळेही मुले घरात बसून कंटाळली आहेत. शाळा कधी सुरू होते आणि कधी मित्र-मैत्रिणींसोबत खेळायला मिळतेय याची विद्यार्थी वाट पाहात आहेत. परंतु पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात लहान मुलांनाही कोरोना संसर्गाचा धोका सांगितला आहे. त्यामुळे यंदा नर्सरी, केजीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता कमीच दिसते. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झालेला दिसत आहे.

शहरातील नर्सरी टु केजीच्या शाळा

२०१९-२०- २०१(शाळा)- २७७०४

२०२०-२०२१- २०४(शाळा)- २८९४२

 

गत वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलेच शाळेत येत नसल्याने, अनेक पालकांनी शैक्षणिक शुल्कसुद्धा भरलेले नाही. त्यामुळे शाळेचा खर्च भागविणे कठीण जात आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

- प्रा. नितीन बाठे, संस्थाचालक

मागील वर्षीपासून नर्सरी, केजीची शाळा बंद आहे. गत वर्षभरापासून शाळेत मुलांचा किलबिलाटच हरविला आहे. ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. मात्र शाळाच बंद असल्यामुळे पालकांनी शुल्कही दिलेले नाही. त्यामुळे शाळेतील मेंटेनन्स, शिक्षकांचा पगार कसा द्यावा, असा प्रश्न आहे. शासनाने यातून काहीतरी पर्याय काढावा.

- प्रदीप राजपूत, संस्थाचालक

 

कोरोनामुळे मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा बंदच आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा चालविताना कसरत करावी लागत आहे. पालक शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.

- प्रा. प्रकाश डवले, संस्थाचालक

पालक त्रस्त....

शाळा बंद असल्यामुळे मुले ऑनलाइन शिक्षण घेत असली तरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. मुले घरात राहून कंटाळली आहेत. त्यांच्या शैक्षणिक सत्राविषयी चिंता वाटते. कोरोनामुळे शाळा होतील की नाही याबाबत सध्यातरी साशंकता आहे.

- गाेपाल गावंडे, पालक

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु मुलांना आता ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. शाळा कधी सुरू होतात याची पालकांसोबतच विद्यार्थीही वाट पाहात आहेत. मोबाइल स्क्रीनवर विद्यार्थ्यांचा अधिक वेळ जात असल्याने, त्यांच्या डोळ्यांवर, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- अनुराधा खंडारे, पालक

 

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यात आता लहान मुलांनासुद्धा धोका असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू होणे कठीण वाटते. परंतु मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचीही चिंता वाटते. ऑनलाइन शिक्षणाचा सातत्याने मारा होत असल्याने, विद्यार्थीही आता कंटाळले आहेत.

- प्रवीण शिंदे, पालक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAkolaअकोला