शहरात काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याची परिस्थिती आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरीही, नागरिकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्याचे परिणाम समाेर येत असून बुधवारी शहरातील तब्बल २६४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ९७ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये १९, उत्तर झोनमध्ये ३९ व दक्षिण झोनमध्ये तब्बल १०९ असे एकूण २६४ रुग्ण आढळून आले आहेत.
१०८२ जणांनी केली चाचणी
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाच्या चाचणी केंद्रांत बुधवारी १०८२ जणांनी चाचणी केली. यामध्ये २८३ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली, तसेच ७९९ जणांनी रॅपिड ॲन्टिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.