अकोला : अमरावती परिक्षेत्रात आठ वर्ष आणि अकोला जिल्ह्यात चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण करणाºया जिल्हयातील २७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या एप्रिल महिन्यात होणार आहेत. अकोला जिल्ह्यात असे २७ पोलीस बदलून जाणारे असून, काही ठाण्यांचे प्रभारीही यामध्ये सहभागी आहेत. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अमरावती परिक्षेत्रातील आणि जिल्ह्यातील बदलीपात्र अधिकाºयांचा एक वर्षाचा कार्यकाळ वाढविला होता; मात्र आता जिल्ह्यात चार वर्षे पूर्ण करणाºया पोलीस अधिकाºयांच्या बदल्या होणार आहेत. आधीच जिल्ह्यात पोलिसांची कमतरता असून, त्यातच आता पोलिसांच्या बदल्या होणार असल्याने रिक्त पदांचा बोजा वाढणार आहे. अकोल्यात येण्यास अधिकारी इच्छुक नसल्याने आहेत त्या पोलीस अधिकाºयांवर व कर्मचाºयांवर कामाचे ओझे वाढणार असल्याचे वास्तव आहे. सदर बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आहे. या अधिकाºयांचा कार्यकाळ पूर्ण अमरावती परिक्षेत्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आठ वर्षे सेवा पूर्ण करणाºया अधिकाºयांमध्ये नोकरी करून रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रावसाहेब वानखडे, विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार बाहकर, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश महादेवराव शेळके, एमआईडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गुलाबराव चव्हाण, बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एपीआय तिरूपती अशोक राणे, एपीआय शैलेंद्र लहुजी ठाकरे, मोटर परिवहनचे पोलीस निरीक्षक मोहम्मद आरिफ वारूणकर, पोलीस उप-निरीक्षक अरविंद रामभाऊ जाधव यांचा समावेश आहे.जिल्ह्यात यांना चार वर्षे पूर्णअकोला जिल्ह्यात चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण कणारे सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, राजू जानराव भारसाकळे, प्रेमानंद दादाराव कात्रे, गणेश कृष्णा वनारे, नंदकिशोर श्रीकृष्ण नागलकर, राजेश नानाजी जोशी, अमित हरिभाऊ डहारे, संतोष यादवराव आघाव, जयसिंग प्रतापराव पाटील, रणजित मदनसिंग ठाकूर, रामराव गरदल राठोड, किशोर झनकलाल मावस्कर, छाया माधवराव वाघ, प्रकाश उत्तमराव कटाले, दिलीप शालीग्राम गवई, शैलेश सुरेश मस्के, गणेश जानकीराम कोथळकर यांचा समावेश आहे.