शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११८६ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९३६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील १८, बाबुळगाव येथील १६, लोहारा येथील १३, गोरक्षण रोड येथील ११, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व कंजरा येथील प्रत्येकी चार, मलकापूर, खिरपूरी बु. व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, अयोध्या नगर, तापडीया नगर, दातवी, सहकार नगर, कौलखेड व कोठारी बु. येथील प्रत्येकी दोन, गणेशनगर, खदान, कलेक्टर ऑफिस, केशव नगर, खडकी, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, केळीवेळी, सातव चौक, जूने शहर, रणपिसे नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, गाडगे नगर, सिंधी कॅम्प, जठारपेठ, वडद, बोरगाव मंजू, मनारखेड, आगर, पातूर, हिंगणा उमरा, पिंपरी अडगाव, सुधीर कॉलनी, बी अँड सी क्वॉर्टर, पाचगणी ता.पातूर, मोठी उमरी, अकबर प्लॉट, निभोंरा, बार्शीटाकळी, बोरगाव वैराळे व दहिहांडा येथील प्रत्येकी एक अशा १५६ रग्णांचा समावेश आहे. सायंकाळी सायंकाळी १२१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामध्ये २९ महिला व ९२ पुरुषांचा समावेश आहे. घुसर येथील १४, डाबकी रोड व अकोट येथील प्रत्येकी सहा, जठारपेठ व पिंजर येथील प्रत्येकी पाच, रतनलाल प्लॉट, कौलखेड, बार्शीटाकळी व दुर्गा चौक येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, शास्त्री नगर, मलकापूर व खोलेश्वर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, रणपिसे नगर, टॉवर चौक, पत्रकार कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, गिता नगर, शिवाजी नगर, मोठी उमरी, गोरक्षण रोड, झोडगा ता.बार्शीटाकळी, पिंपंळखुटा, न्यु तापडीया नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी दोन, अग्रसेन नगर, अंबीका नगर, रजपूतपुरा, गंगा नगर, जामोदे लेआऊट, कापशी, स्वावलंबी नगर, भागवतवाडी, बाबुळगाव जहॉ., आदर्श कॉलनी, गड्डम प्लॉट, टेलीफोन कॉलनी, सातव चौक, बिर्ला कॉलनी, जवाहर नगर, संतोष नगर, लहान उमरी, चर्तुभूज कॉलनी, रामदासपेठ, राम नगर, निंबी ता.बार्शीटाकळी, चोहेगाव ता.बार्शीटाकळी, हातोली ता.बार्शीटाकळी, राजनखेड ता.बार्शीटाकळी, गायत्री नगर, काँग्रेस नगर, सिंधी कॅम्प, पोलिस हेडक्वॉटर, हिवरखेड, कान्हेरी गवली व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
दोघांचा मृत्यू
मंगळवारी सिद्धार्थवाडी, नायगाव अकोला येथील ६१ वर्षीय पुरुष व माऊलीनगर, खडकी येथील ७४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला. दोघांना अनुक्रमे १८ व २२ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २२, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सात, अशा एकूण ४४ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
२,३८६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,४१८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,६७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,३८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.