हरभऱ्याला दर स्थिर
अकोला : खरीप हंगाम सुरू असल्याने बाजार समितीत आवक कमी आहे; मात्र हरभऱ्याचे दर स्थिर असून, बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
नदीपात्रात कचऱ्याचे ढिगारे!
अकोला : दोन दिवसांनंतर मोर्णा नदी पात्रातील पूर ओसरला आहे; मात्र या पुरात वाहून आलेला कचरा जागोजागी दिसून येत आहे. या कचऱ्याचे ढिगारे ठिकठिकाणी जमा झाले आहे.
पाण्यामुळे लाखोंचे नुकसान
अकोला : शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे एस. ए. कॉलेजसमोरील कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्यावरील दुकानांमध्ये पाणी भरले होते. या ठिकाणी झेरॉक्स, हॉटेल अशा विविध व्यवसायांची दुकाने आहेत. या दुकानांतील पाणी काढले असून, लाखो रुपयांचे साहित्य खराब झाले आहे.
पूरग्रस्तांना मदत द्या!
अकोला : शहरात २२ जुलै रोजी झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना तातडीने मदत व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिवर्तन अभियान बहु. संस्था तसेच जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
डाबकी रोडवर डबके साचले!
अकोला : गत काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे डाबकी रोडवर दोन-तीन ठिकाणी मोठे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.