अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील २९ गावांमध्ये सद्यस्थितीत ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यातही पाणीटंचाईग्रस्त या गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्याप जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने, नदी-नाल्यांना पूर आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमधील २९ गावांमध्ये प्रशासनामार्फत ३४ टँकरद्वारे पाणीपुरठा करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यातही या पाणीटंचाईग्रस्त गावांमधील ७१ हजार ९१९ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका गावेअकोला ३बार्शीटाकळी ८अकोट ३बाळापूर ७पातूर ७मूर्तिजापूर १.................................एकूण २९