लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय विज्ञान शिक्षणसंस्था नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा जिल्हाभरातील २९६ विद्यार्थ्यांनी दिली.अकोल्यातील ज्युबिली इंग्लिश स्कूल आणि अकोटमधील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय या दोन केंद्रांवर रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातील १५० शाळांमधील इयत्ता नववीत प्रवेशित २९६ विद्यार्थी सहभागी झाले होते. ही परीक्षा १०० गुणांची होती. यामध्ये १०० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून शहरी भागातून ३०, तर ग्रामीण भागातून ४० विद्यार्थी निवासी प्रशिक्षण शिबिराकरिता गुणानुक्रमे निवडण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये संशोधन प्रकल्प, वैज्ञानिक कृती, विज्ञान प्रश्न स्पर्धा, शैक्षणिक सहल, प्रश्न मंजूषा, वैज्ञानिक गप्पा, विज्ञानातील लोकप्रिय व्याख्याने, मुलाखती, चर्चा, वाचन, प्रयोग दिग्दर्शन, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची माहिती व मार्गदर्शन होणार आहे.
२९६ विद्यार्थ्यांनी दिली विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 8:32 PM
अकोला : राष्ट्रीय विज्ञान शिक्षणसंस्था नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा जिल्हाभरातील २९६ विद्यार्थ्यांनी दिली.
ठळक मुद्देअकोल्यातील दोन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आलीपरीक्षेला जिल्ह्यातील १५० शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते