- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा निर्णय राज्यात सत्तारूढ झालेल्या नवीन सरकारकडून लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यानुसार संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय झाल्यास, जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून केव्हा जाहीर होतो, याकडे आता शेतकºयांचे लक्ष लागले आहे.२८ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले असून, सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकºयांना तातडीने कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत २ लाख ९७ हजार ६६८ शेतकरी आहेत. किमान समान कार्यक्रमानुसार शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यास जिल्ह्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय नवीन सरकारकडून केव्हा जाहीर होतो, याकडे आता शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
अडीच वर्षांपूर्वीच्या कर्जमाफीत केवळ १.३२ लाख शेतकºयांना लाभ!अडीच वर्षांपूर्वी २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३० जून २०१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. या कर्जमाफी योजनेत शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले होते.त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ९९ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ४५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी गत अडीच वर्षांत केवळ १ लाख ३२ हजार शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.