पळसाेबढे या गावाने कायम जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व केलेय. जुन्या पिढीत धोत्रे कुटुंबीयांतील माजी आमदार श्यामराव धोत्रे, माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. अलीकडच्या वीस वर्षांत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि त्यांचे भाचे असलेले भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या हाती जिल्ह्याची सूत्रे आहेत या ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संजय धोत्रे कधीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गावाच्या निवडणुकीत स्वतः रस घेत नाहीत. या निवडणुकीत गावात असलेल्या दोन्ही पॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडी, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विखुरलेले आहेत. मावळत्या ग्रामपंचायतीत वंचित आणि भाजपची संयुक्त सत्ता होती. या निवडणुकीत गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकीय राजधानीवर कुणाशी जवळीक असलेल्यांची सत्ता येते याचे उत्तर १८ जानेवारीच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.
नामदार आमदाराच्या पळसाेबढेत १३ जागांसाठी ३० उमेदवारांची टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:45 AM