अकोला : मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्गावरील मोनिका वाइन बारमध्ये असलेला तब्बल ३0 लाख रुपयांचा दारूचा अवैध साठा जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जप्त केला. राष्ट्रीय महामार्गावरील हा वाइन बार बंद केल्यानंतरही यामधून दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. या ठिकाणावर वाइन बारचा जितेश गुप्ता मालक व आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.मूर्तिजापूर शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी जितेश मुंचन गुप्ता, संजय भोलाशंकर गुप्ता या दोघांच्या मालकीचा मूर्तिजापूर बायपास येथे मोनिका वाइन बार आहे. सदर वाइन बार राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आला आहे; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने या बंद वाइन बारमधून लाखो रुपयांच्या दारूची अवैधरीत्या विक्री आणि वाहतूक सुरू होती. पोलिसांनी ही दारु जप्त केली. राज्यातील मोठी कारवाईराज्यात ३0 लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेचा दारू साठा अद्याप जप्त करण्यात आलेला नाही. विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ३0 लाख रुपयांच्यावर विदेशी दारूचा साठा बंद वाइन बारमधून जप्त करण्यात आला आहे. ही राज्यातील मोठी कारवाई असून, हा दारू साठा उत्पादन शुल्क विभागाच्या संमतीशिवाय पोहोचलाच नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मोनिका वाइन बारमधील दारू विक्रीमागे उत्पादन शुल्क विभागाची हप्तेखोरी असल्याचे सूत्रांनी सांगितले."हप्ता" देत असल्याचा आरोपविशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी मोनिका वाइन बारमधून दारूचा साठा जप्त केला. त्यानंतर बार मालकासह कामगारांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असतील तर त्यांना आम्ही मोठा हप्ता देत असल्याचा जाहीर आरोप केला.खुलेआम दारू विक्री करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही हे आदेश झुगारून या वाइन बारमधून खुलेआम दारू विक्री करण्यात येत होती. तब्बल २५ लाखांचा दारू साठा जप्त करण्यात आला असून, हा आकडा आणखी वाढणार आहे. दारू किती रुपयांची आहे, हे काम सुरू करण्यात आले असून, रविवारी हा आकडा स्पष्ट होईल.- हर्षराज अळसपुरे,प्रमुख, विशेष पथक, अकोला.
मोनिका वाइन बारमधून ३0 लाखांचा दारू साठा जप्त
By admin | Published: April 30, 2017 3:19 AM