शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

आॅफलाइन वाटपाच्या संधीमुळे ३० टक्के धान्याचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:08 PM

आॅफलाइन धान्य वाटपाला प्रोत्साहन दिल्याने त्या धान्याचा काळाबाजार करण्याचा धंदा सध्या तेजीत आल्याचे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.

अकोला : धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या आॅनलाइन वाटपाला फाटा देत दुकानदार, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षकांनी आॅफलाइन धान्य वाटपाला प्रोत्साहन दिल्याने त्या धान्याचा काळाबाजार करण्याचा धंदा सध्या तेजीत आल्याचे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. अकोला शहरात ४५ टक्के, अकोला ग्रामीणमध्ये ३० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात २० टक्के धान्याचे वाटप आॅफलाइन होत असल्याने काळाबाजार करण्याच्या संधीचा फायदा घेतला जात आहे.शिधापत्रिकेशी आधार लिंक लाभार्थींची ओळख आॅनलाइन पटवून धान्य वाटप करण्यासाठी ‘एई-पीडीएस’प्रणाली तयार झाली. अकोला जिल्ह्यात जानेवारी २०१८ पासून आॅनलाइन पद्धतीने धान्य वाटप सुरू आहे. कार्डधारकांना पॉस मशीनद्वारे आॅनलाइन ओळख पटवून धान्य दिले जाते. ग्रामीण भागात ७० ते ७५ टक्के लाभार्थींना, तर अकोला शहरात केवळ ५५ ते ६० टक्के लाभार्थींना आॅनलाइन वाटप होत आहे. लाभार्थींचे आधार लिंक होऊनही पॉस मशीनद्वारे पडताळणी होत नाही, या कारणासाठी आॅफलाइन पद्धतीने धान्य देण्याची मुभा आहे. दुकानदारांकडे नोंद असलेल्या एकूण लाभार्थींपैकी सरासरी १० ते २५ टक्के धान्य घेण्यासाठी लाभार्थीच येत नसल्याची माहिती आहे. त्यांच्या लाभाचे धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहत आहे; मात्र दुकानदारांकडून संबंधित लाभार्थींच्या ‘नॉमिनी’ला ते धान्य वाटप केल्याची नोंद केली जात आहे. त्यासाठी शासनाने रूट आॅफिसर नेमून दिले. त्या सर्वांना मॅनेज करून धान्याचे आॅफलाइन वाटप दाखविले जात आहे. वास्तवात ते लाभार्थीच नसल्याची माहिती आहे. ही बाब हेरून शासनाने धान्य उचलणाऱ्या ‘नॉमिनीं’चीही तपासणी करण्याचा आदेश जून २०१८ मध्येच दिला; मात्र त्यानुसार तपासणी करण्यालाही निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षकांनी ‘खो’ दिला. त्यामुळे आॅफलाइन वाटप सुरूच ठेवत त्याचा काळाबाजार करण्याची संधी पुरवठा विभागाच्या यंत्रणेकडूनच दिली जात असल्याचा प्रकार घडत आहे.जून २०१८ मध्ये ‘नॉमिनी’मार्फत झालेल्या आॅनलाइन ट्रान्जक्शनची तपासणी करणे, त्याचा अहवाल न देणाºया जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्ताच्या पथकाने प्राधान्यक्रमाने कार्डधारकाच्या घरी भेट देऊन त्याचा अहवाल शासनाकडे द्यावा, जुलै २०१८ मध्ये प्रत्येक ‘नॉमिनी’ची प्रथम बायोमेट्रिक पडताळणी करणे, ‘नॉमिनी’ची ओळखपरेड करणे, यासाठी शासनाने दिलेल्या सर्व आदेशांना पुरवठा विभागाने ‘खो’ दिला आहे. परिणामी, धान्याचा काळाबाजार होण्याच्या घटना उघड होत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोला