युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागात ३० हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:09 PM2018-09-09T13:09:50+5:302018-09-09T13:10:57+5:30

अकोला : युवक काँग्रेसच्या राज्यासह जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात येणार असून, यासाठी अमरावती विभागातील तब्बल ३० हजार युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान करणार आहेत.

30 thousand voters in the Amravati division for Youth Congress elections | युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागात ३० हजार मतदार

युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागात ३० हजार मतदार

Next
ठळक मुद्देसर्वाधिक मतदारांची नोंद अमरावती जिल्ह्यात. ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तब्बल ३० हजारांवर युवक काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झालेली आहे.

- सचिन राऊत

अकोला : युवक काँग्रेसच्या राज्यासह जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात येणार असून, यासाठी अमरावती विभागातील तब्बल ३० हजार युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान करणार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद अमरावती जिल्ह्यात असून, त्यानंतर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभर युवक काँग्रेस सदस्यांची नोंदणी करण्यात येत असताना अमरावती विभागातही नोंदणी करण्यात आली असून तब्बल ३० हजारांवर युवक काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ. अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत, तर प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले उभे आहेत. यासोबतच जिल्हाध्यक्ष पदासाठी महेश गणगणे, निनाद मानकर, तर शहराध्यक्ष पदासाठी अंशुमन देशमुख, आकाश शिरसाट, सुमती गवई उभे आहेत. जिल्हा महासचिव पदासाठी अभिलाष तायडे, फारुख पटेल रिंगणात आहेत.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या
अकोला -                      ८०१३
अमरावती -                 ८३६३
बुलडाणा -                   ८२८४
वाशिम -                     ३५२८
---------------------------------


आज अकोटमध्ये मतदान
युवक काँग्रेसच्या पदांसाठी ९, १० व ११ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात म्हणजेच रविवारी अकोला जिल्ह्यातील केवळ अकोट तालुक्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात अकोट तालुक्यात सर्वाधिक मतदारांची संख्या असून, त्यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ अकोटमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तरांचल येथील २२ जणांची टीम दाखल झाली आहे.

काँग्रेसमधील दुसरी फळी एकवटली!
राज्य स्तरावरील प्रदेश महासचिव पदासाठी जिल्ह्यातून सागर कावरे व अभिषेक भरगड रिंगणात आहेत. कावरे यांच्यासाठी काँग्रेसमधील मराठा कार्ड चालविण्याचा प्रयत्न होत असून, दुसरी फळी एकवटून काम करीत असल्याचे चित्र आहे. अभिषेक भरगड यांच्यासाठीही एक फळी जोमाने कामाला लागली आहे.


एका मिनिटात पाच उमेदवारांना मतदान
या टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. ‘अ‍ॅप’द्वारे पाच उमेदवारांना मतदान करण्यासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ मिळणार आहे.

 

Web Title: 30 thousand voters in the Amravati division for Youth Congress elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.