शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सुरळीत विजेसाठी अकोला परिमंडलातील ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:41 PM

Msedcl News : सुरळीत विजेसाठी अकोला परिमंडलातील ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर आहेत.

अकोला: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्याा पाार्श्वभूमीवर कोव्हीड रूग्णालयासह सर्व  अत्यावशक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अकोला परिमंडलातील महावितरणचे सुमारे ३ हजार अधिकारी ,अभियंते व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. 

       कोरोनाच्या दुसऱ्या वेवचे रूद्रावतार बघता ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय तसेच खाजगी रूग्णालये,कोव्हीडचे विशेष कक्ष,विलगीकरन कक्ष याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावशक सेवांना  अखंडित वीज पुरवठा मीळेल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतल्या जात आहे.या शिवाय अत्यावशक सेवेसाठी तत्काळ नविन वीज जोडणी देण्याची प्रक्रीयाही महावितरणकडून राबविली जात आहे. 

        लॉकडाऊनमध्ये नागरीकांना घरी बसणे सुरळीत वीज पुरवठ्यामुळेच शक्य होत आहे.त्यातच आता दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत आहे.सर्वच नागरिक घरी असल्याने टिव्हीसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे.त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत. 

    अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात महावितरणचे  ३०० अभियंते,१५७१ जनमित्र, २७९ यंत्रचालक,३७१ बाह्यस्त्रोत कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहे.यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्यासाठी व्यवस्थापनातील ४५१ पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही आपली सेवा बजावत आहे. कोरोनाचे संकट बघता महावितरणचे कर्तव्य बजावतांना गेल्या वर्षभरात अकोला २४३ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.सध्यास्थितीत ५९ कर्मचारी हे कोरोना बाधित असून ०३ कर्मचाऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.तरीही महावितरण ग्राहकांच्या सेवेत आहे.वीज ग्राहकांनी कोरोना विरूध्दच्या या लढाईत मास्क,सामाजिक दुरीचे अंतर राखत  शासनांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ