अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीअखेरपर्यंत राज्यात ९ हजार १६७ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांत ३० हजार १४९ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. त्यामध्ये निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींच्या कामांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. ‘नरेगा’अंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात फेब्रुवारीअखेरपर्यंत राज्यात ९ हजार १६७ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, राज्यातील विविध जिल्ह्यांत सद्य:स्थितीत ३० हजार १४९ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत.
गेल्या वर्षात २० हजार सिंचन विहिरींच्या कामांवर २३४ कोटी खर्च!
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्यात २० हजार १०५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. त्यावर २३४ कोटी ६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे ‘नरेगा’ आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.