शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ३०५ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 2:23 PM

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या.

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबाराला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर,मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सभागृहात उपस्थित तक्रारकर्त्या नागरिकांकडे जाऊन तक्रारी स्वीकारल्या. मागील जनता दरबारात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागांमार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत, सामूहिक व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी पालकमंत्र्यांनी स्वीकारल्या. त्यामध्ये विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभाग,मनपा, विद्युत विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा उपनिबंधक, समाजकल्याण, भूमिअभिलेख विभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, पाटबंधारे विभाग, कृषी विद्यापीठ,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा अग्रणी बँक, समाजिक वनीकरण व इतर विभागासंबंधी तक्रारींचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. अशा करण्यात आल्या सामूहिक तक्रारी!जनता दरबारात विविध प्रश्नांवर जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे सामूहिक तक्रारी केल्या. त्यामध्ये मूर्तिजापूर येथील राजगुरू नगरमधील रहिवाशांनी दलित वस्तीमध्ये रस्ता, पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या आदी सुविधा नसल्याची तक्रार दिली. तसेच धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतातून गेल्याने शेत खराब झाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील ढाकलीच्या शेतकºयांनी केली. मनपा हद्दवाढीत समाविष्ट ग्रामपंचायतींच्या कर्मचाºयांचे महानगरपालिकेत समायोजन करण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आली. मनपाने सेवेतून कमी केलेल्या अस्थायी कलाशिक्षकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी अस्थायी कलाशिक्षकांच्यावतीने करण्यात आली.सामाजिक वनीकरण विभागात कामांत गैरव्यवहार झाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील झोडगा व वस्तापूर या गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे केली. शेतकºयांना त्रास देणारे चान्नी येथील तलाठी लाड यांची बदली करण्याची मागणी चान्नी येथील शेतकºयांनी पालकमंत्र्यांकडे केली. प्राप्त सामूहिक तक्रारींची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील